गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (15:33 IST)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर तीघे ठार तर सात जखमी

मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर भरधाव कार एका कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची  प्रकृती चिंताजनक आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बोरज गावाजवळ टायर फुटल्याने एक  कंटेनर उभा होता. भरधाव वेगात असलेल्या कार चालकाला कंटेनर  ‍दिसला होता. परंतु चालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो कंटेनरवर  जोरात धडकला. 
 
तेजल सुहास जगताप(23), लक्ष्मी नारायण चौघुले(45) व  यतिन नारायण चौघुले (24) अशी मृतांची नावे असून सर्व  पुण्यातील रहिवासी आहेत.