गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 एप्रिल 2015 (13:54 IST)

मुंबईत राष्ट्रवादी तर औरंगाबादेत युतीची आघाडी

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली असून औरंगाबादेत सेना-भाजप युतीने आघाडी घेतली आहे. 
 
नवी मुंबईत महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४८.३५ टक्के मतदारराजांनी मतदानाचा हक्क बजावून १११ प्रभागातील ५६८ उमेदवारांचा निकाल बुधवारी ईव्हीएममध्ये बंद आहे. 
 
उन्हाचा जोरदार चटका, दगडफेकीच्या घटना आणि पैशाचे खुलेआम वाटप, अशा वातावरणात महापालिका निवडणुकीसाठी रंगाबादकरांनी बुधवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान पाच ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या, तर एका ठिकाणी जोरदार राडा झाला. दोन उमेदवारांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. २०१० च्या निवडणुकीत केवळ ५८ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी मतमोजणी होईल. 
 
औरंगाबादेत ४० टक्के मतदान झाले असून आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. सेना-भाजप महायुतीने १४ जगांसह आघाडी घेतली आहे.