गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

राज ठाकरेंना मेधा पाटकर यांची टीका

WD
महाराष्ट्र नवविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील राजदूत आहेत. त्यामुळेच त्यांना गुजरात महाराष्ट्रापेक्षा विकसित वाटतो, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यंनी केली आहे. गुजरातमध्ये लोकांचे आवाज दाबले जातात. नरेंद्र मोदींच्या सरकारची महाराष्ट्रातील सरकारशी तुलना शक्यच नाही. गुजरात महराष्ट्रापेक्षा पिछाडीवर आहे, असे सांगितले जात आहे, मात्र गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील सरकार कितीतरी पटीने चांगले आहे, असे प्रमाणपत्र मेधा पाटकर यांनी देऊन टाकले. गुजरातमध्ये चळवळींची गळपेची होते. महराष्ट्रात मात्र कार्यकर्त्यांचे म्हणणे एकून घेतले जाते. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.