बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 12 मे 2016 (10:59 IST)

राज्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील दुष्काळसदृश गावांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे, अशा ठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा,असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यानंतर काल रात्री राज्य सरकारनं तातडीनं राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला.

2015-16 मधील खरीप हंगामातील अंतिम आणेवारीत ज्या गावांमध्ये 50 पैशापेक्षा कमी आहे, त्या गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. आधी या गावांना दुष्काळसदृश म्हणून घोषित केलं होतं, विविध योजना आखल्या होत्या. आता ‘दुष्काळसदृश’ ऐवजी ‘दुष्कळ’ वाचावा, अशी अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे.