गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2015 (11:07 IST)

सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार यांचं निधन

प्रसिद्ध ट्रॅव्हल्स कंपनी 'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं काल निधन झालं. न्यायालीन कोठडीत असलेल्या सचिन जकादार यांना तीन महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची आज प्राणज्योत मालवली.
 
फसवणूक केल्याप्रकरणी जकातदार यांना शिवाजी पार्क पोलिसांनी चार महिन्यापूर्वी अटक केली होती. जकातदार यांच्यावर 80 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
 
'सचिन ट्रॅव्हल' हे नाव ट्रॅव्हलिंग क्षेत्रात आग्रहाने घेतलं जातं. मुंबई- महाराष्ट्रात अनेक प्रवाशांनी या कंपनीला पसंती दिली होती. त्यामुळे अल्पावधीतच सचिन ट्रॅव्हल्स हे नाव प्रसिद्ध झालं होतं.