शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

भारतरत्न हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न- सचिन

'भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळालेले व्यक्ती देशाचे हिरो आहेत. त्या व्यक्ती माझ्यापेक्षाही खूप मोठ्या आहेत. त्यासाठी मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हा पुरस्कार मिळाला तर ही अभिमानाची बाब असणार आहे. कारण हा पुरस्कार मिळविणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे,' असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितले.

ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतक केल्यानंतर प्रथमच सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी क्रीडासह सर्वस्तरातून होऊ लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही सचिनची भारतरत्नसाठी शिफारस करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेनेही सचिनला भारतरत्न मिळावे ही मागणी केली आहे. त्यानंतर त्याने प्रथमच आपले मत याबद्दल व्यक्त केले. तो म्हणाला,' सध्या माझे लक्ष फक्त मैदानावर आहे. पुरस्काराबाबत मी विचार करीत नाही. परंतु हा पुरस्कार मिळाला तर ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची बाब असणार आहे.'

कपिल देव आणि अजित वाडेकर यांनी सर्वप्रथम सचिनने क्रिकेटमध्ये गाठलेल्या मैलाचा टप्प्याबद्दल त्याला भारतरत्न देण्याची मागणी केली होती.