शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (15:08 IST)

शिवाजींची सहनशीलता

एकदा छत्रपती शिवाजी अरण्यात शिकार करण्यासाठी चालले असत. थोडं पुढे वाढल्यास त्यांचा जवळ एक दगड येऊन पडतो तेव्हा शिवाजी रागावून इकडे तिकडे बघू लागतात पण त्यांना कोणीच दिसत नाही. 
 
तेवढ्यात एक म्हातारी पुढे येते शिवाजींना म्हणते "मी हा दगड फेकला आहे.
तेव्हा "शिवाजी तिला विचारता, "आपण असे का केले?"
त्यावर म्हातारीने सांगितले की 'माफ करा राजन मला या आंब्याच्या झाडावरून काही आंबे काढावयाचे होते, पण वृद्धावस्थेमुळे मी झाडांवरील आंबे तोडण्यास असमर्थ असल्यामुळे दगड फेकून आंबे पाडण्याचा प्रयत्न करत होते. परंतू चुकीने दगड आपणास लागला. मला माफ करा महाराज. 
 
म्हातारीच्या या कृत्यावर अजून कोणी असतं तर दंड देण्यात पुढे-मागे बघितलं नसतं परंतू शिवाजी असे कसे करतील. अशा परिस्थितीत त्यांनी विचार केला की "जर हे झाडं इतके सहनशील असू शकतो की ज्याने त्याला दगड मारले त्यांना देखील गोडं फळ देतं तर मी राजा असून सहनशील का होऊ शकत नाही ? 
 
असा विचार करून त्यांनी त्या वृद्ध स्त्रीला काही पैसे देऊन महाराज तिथून निघून गेले.