शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

अँण्डी मरेने इतिहास घडविला

WD
विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँण्डी मरेने इतिहास घडविला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले.

त्याने ब्रिटनचा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला आणि 77 वर्षानंतर ब्रिटनला प्रथमच ही स्पर्धा जिंकून दिली. त्याने काल खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत जगात अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविक याचा सरळ तीन सेटस्मध्ये 6-4, 7-5, 6-4 असा पराभव केला.

ही लढत जवळ-जवळ चार तासांची ठरली आणि या पूर्ण लढतीत मरेने आपल्या प्रभावी सर्व्हिस, ड्रॉप शॉटस् तसेच रॅलीचा जबरदस्त खेळ करीत जोकोविकला निष्प्रभ केले. ही लढत अपेक्षेप्रमाणे खेळली गेली नाही व हा सामना एकतर्फी ठरला.

होम फेव्हरिट मरे विरुध्द हॉट फेव्हरिट जोकोविक यांच्यात ही अंतिम झुंज झाली. ब्रिटनच्या अँण्डी मरेला गतवर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररने नमवले होते. त्यानंतर दुसर्‍या वेळी मरेने अंतिम फेरी गाठली आहे. या वर्षीच्या स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत चढउतार झाले.

राफेल नडाल, रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स हे मातब्बर खेळाडू लवकर गारद झाले, परंतु अव्वल स्थानावरील जोकोविक व दुसर्‍या स्थानावरील मरे यांनी चिकाटीने अंतिम फेरी गाठली. 1922 नंतर विम्बल्डनच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा मरे हा ब्रिटनचा तिसरा खेळाडू आहे.

1936 साली फ्रेड पेरी याने बनी ऑस्टीन याचा अंतिम फेरीत पराभव करून विम्बल्डन जिंकले. त्यानंतर ब्रिटनला या स्पर्धेचे विजेतेपद म‍िळाले नाही. 77 वर्षानंतर मरे हा विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा होती. परंतु, इतिहास व मरे यांच्यात जोकोविक आडवा आला होता.

ही अंतिम लढत पाहण्यास तिकिटे खरेदी करण्यासाठी शनिवारी सकाळी प्रेक्षकांनी रांग लावली होती. हा सामना पाहण्यास पंधरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. उपान्त्य फेरीत मरेने पोलंडच्या जर्झी जानोविकझच 6-7 (2-7), 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला होता. जोकोविकने अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोवर पाच तासाच लढतीत 7-5, 4-6,
7-6 (7-2), 6-7 (6-8), 6-3 असा विज म‍िळविला होता.

एकूण 18 लढतीत जोकोविकने मरेला 11 वेळा नमवले आहे. हिरवळीच्या कोर्टवरील एकमेव लढतीत जोकोविकने मरेला नमवले होते. या दोघात ही तिसरी अंतिम लढत आहे. अमेरिकन स्पर्धेत मरेने तर ऑस्ट्रेलिन स्पर्धेत जोकोविकने बाजी मारली आहे.