मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 जुलै 2014 (20:17 IST)

अंतिम श्वासापर्यंत मी भारतीयच- सानिया मिर्झा

अंतिम श्वासापर्यंत मी भारतीयच राहणार असून मला पाकिस्तानी सून म्हणून हिनवू नका असे स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिनी प्रतिक्रिया दिली आह. तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावर सानिया मिर्झाच्या नियुक्तीविषयी उठलेल्या वादंगावर सानियांनी प्रत्युत्तर देऊन टिकाकारांना झटका दिला आहे.

सानिया मिर्झा ही हैदराबाद येथील आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सानियाने पाकिस्ताननी क्रिकेटपटूशी विवाह केला होता. त्यानंतर ती पाकिस्तानी सून असून तिला तेलंगणचे ब्रँड अँम्बेसेडरपद द्यायला नको, असे विधान तेलंगणमधील भाजप नेते के.लक्ष्मण यांनी केले होते. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या विधानाशी सहमती दर्शवली होती. भाजपच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे. या वादावर सानिया मिर्झाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढून टीकाकारांना उत्तर दिले आहे.

सानियाच्या मते, ती जन्मापासून भारतीय नागरिक आहे. तसेच अ‍ंतिम श्वासापर्यंत ती भारतीयच राहणार आहे. देशातील राजकीय नेत्यांनी या वादावर ऐवढा वेळ खर्च करावा, हे फारच दुर्दैवी असल्याचेही सानियाने म्हटले आहे.

दुसरीकडे, केंद्रीय पर्यावरण आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सानिया मिर्झा हिला भारताची ब्रँड अँम्बेसेडर असल्याचे म्हटले आहे