शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:47 IST)

अगामी ‘आॅलिम्पिक’ भारतात नाही

पूर्ण तयारी आणि परिपूर्ण माहितीनंतरच आॅलिम्पिकचे यजमानपद घ्यायला हवे अशी भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या शक्यतेला पुर्णविराम दिला.

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि  पंतप्रधान मोदी यांची काल बैठक झाली. यावेळी आयोजनाबाबतचा कोणताही प्रस्ताव भारताने दिला नसल्याचे बाक यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे गेल्या वर्षीच निलंबन समाप्त झाल्यामुळे आता यशस्वी खेळांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, असे आयओसीला वाटत असल्याचे बाक म्हणाले.