बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

आजपासून ऑलिम्पिक महाकुंभमेळा!

WD
गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्यांवर चर्चेत असलेला आणि जगातील सर्वात महागडा सोहळा म्हणून गणल्या जात असलेल्या लंडन येथील 30व्या ऑलिम्पिक स्पर्धेला आज दिमाखदार समारंभाने प्रारंभ होत आहे. ब्रिटनच्या राजेशाही थाटाच्या या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. या सोहळ्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आज, शुक्रवारी लंडनमधील स्थानिक वेळप्रमाणानुसार रात्री 9 वाजता या महाकुंभ क्रीडा मेळ्याचा प्रारंभ होत आहे. भारतात मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास हा सोहळा पहावयास मिळणार आहे. या उद्‍घाटन सोहळ्यानंतर 12 ऑग्सटपर्यंत हा क्रीडा उत्सव चालणार आहे. अलीकडील काळात क्रीडा महासत्ता म्हणून उदयास येत असलेला चीन आणि त्याची जागतिक पातळीवरील भरभराट यामुळे चिंताग्रस्त झालेली अमेरिका यांच्यात पदकांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.