शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: रेसिफे (ब्राझील) , सोमवार, 16 जून 2014 (11:30 IST)

आव्हरी कोस्टची जपानवर मात

सुरुवातीपासून 64 व मिनिटापर्यंत पिछाडीवरून पडलेल्या आव्हरी कोस्ट संघाने दोन मिनिटात दोन गोल करून चमत्कार घडविला.

क गटातील प्राथमिक फेरीच्या दुसर्‍या साखळी सामन्यात आव्हरी कोस्टने जपानचा 2 विरुध्द 1 गोलने पराभव केला. या गटात या सामन्यापूर्वी कोलंबियाने ग्रीसला 3-0 ने नमविले होते. कोलंबिया आणि आव्हरी कोस्टचे प्रत्येकी दोन-दोन गुण झाले आहे. पराभूत झालेल्या ग्रीस आणि जपान संघापुढे दुसरी फेरी गाठण्यासाठी कठीण आव्हान उभे राहिले आहे.

जपानचा संघ आशियाई विजेता आहे. या दोन संघात आजपर्यंत तीन सामने खेळले गेले होते. कोस्टने एक लढत जिंकली होती. जपानने दोन विजय  मिळविले होते. आव्हरी कोस्टचे मानांकन 23 आहे तर जपान त्यांच्यापेक्षा दुप्पट कमी मानांकनावर म्हणजे 46 व्या स्थानावर आहे. आव्हरी कोस्टने विश्वचषकाच प्राथमिक फेरीत हा तिसरा विजय मिळविला. जपानने आक्रमक सुरूवात केली. त्यांनी सामन्यावर पकड घेतली अणि 16 व्या मिनिटास चौथ्या क्रमांकाच्या होंडाने जपानचा पहिला गोल केला. हा मैदानी गोल होता. या गोलमुळे जपानचे खेळाडू फॉर्मात आले. मध्यांतरास जपानचा संघ 1-0 असा आघाडीस होता. जपानने ही आघाडी मध्यांतरानंतरही कायम ठेवली. परंतु आव्हरी कोस्टने अनुभवी डीडी ड्रोगबा याला 62 व मिनिटास मैदानात उतरविले आणि त्याने सामन्याचे चित्र पालटून टाकले. त्याच्या उपस्थितीत पाऊस येऊन ओलसर झालेल्या मैदानावर आव्हरी कोस्टने दोन मिनिटात दोन गोल केले व सामना 2-1 ने जिंकला. राइट बॅकने दिलेल्या वेगवान क्रॉसपासवर विलफ्रेड बोनीने हेडरचा गोल केला. त्याने जपानच्या गोलरक्षकाला संधी दिली नाही. हा गोल होताच जपानचे उपस्थित समर्थक नाराज झाले तर आव्हरी कोस्टच समर्थकांच्या आनंदाला उधाण आले. 66 व मिनिटास क्रॉसपासवर गेरविन्हो याने हेडरचा गोल केला आणि याच गोलमुळे आव्हरी कोस्ट संघ विजयी ठरला. सांप्री लामोरुचीच्या आव्हरी कोस्ट संघाला गुरुवारी कोलंबियाशी खेळावे लागेल तर जपानचा संघ ग्रीसशी खेळेल. 2006 व 2010 मध्ये दुसरी फेरी गाठू न शकणारा आव्हरी कोस्ट संघ यावेळी मात्र दुसरी फेरी गाठण्यास उत्सुक बनला आहे. 64 मिनिटानंतरच्या उर्वरित खेळात जपानने गोल करण्याचे प्रयत्न केले. आव्हरी कोस्ट संघानेही वारंवार आक्रमणे केली. जपानचा गोलरक्षक कावारिमाने अनेक गोल वाचविले.