बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

आशियाई स्पर्धेत नंदिनी परमारने रचला इतिहास

उझबेकिस्तानातील ताश्कंद येथे सुरू असलेल्या 11व्या सीनियर आणि 12व्या ज्युनियर कॅडेट आशियाई कराटे चॅम्पियनशीपमध्ये मध्य प्रदेशच्या नंदिनी परमारने ज्युनियर गटात कास्यपदक पटकावून नवा इतिहास रचला. आशियाई कराटे अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूने पदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या स्पर्धेत 25 देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धेचा समारोप होणार आहे. नंदिनी परमारने बजावलेल्या या कामगिरीबद्दल तिला एक लाख रुपये रोख देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय कराटे डू फेडरेशनचे अध्यक्ष आर. त्यागराजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.