शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: पणजी , शुक्रवार, 13 जून 2014 (11:47 IST)

खेळाडूंना डावलून गोव्याचे आमदार पोहोचले ब्राझीलला?

फिफा विश्वचषकाचा रंगारंग सोहळा पाहाण्याचा मोह गोव्याच्या तीन मंत्र्यासह तीन आमदारांना आवरता आलेला नाही. खेळाडूंना डावलून राज्य सरकारच्या खजिन्यातील तब्बल 89 लाख रुपये खर्च करत हे सगळे महाशय ब्राझील येथे जाण्याची तयारी करत असल्याचे वृत्त एका इंग्रजी भाषिक वृत्रपत्रात म्हटले आहे.

फुटबॉलचा हा महासंग्राम पाहाण्यासाठी गोव्याचे सहा आमदार जाणार असल्याचे समजते. मात्र, ते खासगी टूरवर जात नसून चक्क राज्य सरकारचा निधी त्यासाठी वापरला जाणार आहे. यात राज्याचे क्रीडा मंत्री रमेश तावेडकर यांचाही समावेश आहे. विश्वचषक पाहाण्यासाठी राज्याच्या खजिन्यातील लाखो रुपयांची उधळ होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

ब्राझील दौर्‍यायावर जात असलेल्या शिष्टमंडळात एकही क्रीडा तज्ज्ञ नाही किंवा स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडायाचा एकही सदस्य नाही. मत्स्यपालन मंत्री अवेरटेनो फुर्टाडो, ऊर्जा मंत्री मिलिंद नाईक आणि तीन आमदार आहेत. क्रीडा मंत्री तावेडकर हे पहिल्यांदा परदेश दौरा असणार आहे.