शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , शुक्रवार, 29 जून 2012 (18:53 IST)

खेळायला आलेलो आहे, राजकारण करायला नाही: लिएंडर पेस

ND
ND
भारतीय टेनिसला अंर्तबाह्य पोळून काढणार्‍या निवड वादास प्रत्येक ऑलिम्पिकच्या अगोदर समोर येणारा 'वाचळपणा' संबोधत लिएंडर पेसने सांगितले की, निराश होण्यापेक्षा आपले संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित असून राजकारणावर नाही, असे सांगितले.

भारताचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असूनसुद्धा विष्णु वर्धनसारख्या कनिष्ठ खेळाडूसोबत जोडी बनवल्याने नाराज पेसने स्पर्धेवर बहिष्काराचे सूतोवाच केले होते. पेसचे पसंतीचे जोडीदार महेश भूपती आणि रोहन बोपन्नाने त्याच्यासोबत खेळण्यास नकार दिला, तर मिश्र दुहेरीतील जोडीदार सानिया मिर्झानेही पेसवर निशाना साधताना त्याच्या मनधरणीसाठी आपला उपयोग करण्यात आल्याचे म्हटले होते.

पेसने सांगितले की हा वाद निराशजनक आहे, मात्र आपले संपूर्ण लक्ष खेळावर आहे. चेक गणराच्याचा राडेक स्टीपानेकसोबत वि‍म्बल्डनचा पहिल्या फेरितील सामना जिंकल्यानंतर त्याने मनोदय व्यक्त केला.

आपण खेळासाठी कठोर परिश्रम घेतले असून देश त्याचा सन्मान करत असल्याने आपण नशीबवान आहे. मात्र जे याचा सन्मान करत नाही, ही त्यांची समस्या आहे, असा तो म्हणाला.