शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

गरिबीतून उठून दीपा करमाकरची रिओ ऑलिंपिक फायनलमध्ये धडक

रिओ डी जनैरो : भारताची जिम्नॅस्ट दीपा क्रमाकारने रिओ ऑलिंपिकच्या व्होल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करून फायनलमधील आपलं स्थान पक्कं करत नवा इतिहास घडवला आहे.
त्रिपुराची करमाकर ऑलिंपिक गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. दोन प्रयत्नानंतर 14.850 अंक अर्जित करण्यासाठी तिने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. महिलांच्या व्होल्ट प्रकाराची फायनल 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळवली जाईल. 

इतर रूटीनमध्ये दीपानं अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाइजमध्ये 12.033 गुणांची कमाई केली. ती ओव्हरऑल गुणांमध्ये 27व्या स्थानावर आहे. सर्वाधिक व्यक्तिगत गुण वाले आठ जिम्नॅस्ट व्यक्तिगत वर्गात भाग घेतील.
पुढे वाचा दीपाचा प्रवास आणि पहा फोटो

दीपा करमाकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. स्पर्धेसाठी कॉस्ट्यूमदेखील तिने उधारीवर आणला होता जो तिला फीट नव्हता. 
दीपाने 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.

वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी हे बाधक असतं. असे पाय असणार्‍यांना उडी मारल्यानंतर जमिनीवर लँड करताना बॅलेस करण्यात त्रास झेलावा लागतो. परंतू दीपाने अथक परिश्रम आणि अभ्यासाने आपली ही कमी दूर केली.

2007 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये शानदार प्रदर्शनानंतर दीपाचा उत्साह वाढला. आणि ती अधिक अभ्यास करू लागली. मागल्या वर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने प्रोडूनोवा जिम्नॅस्टमध्ये अंतिम पाचामध्ये जागा बनवली आणि आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघाने तिला विश्व स्तरीय जिम्नॅस्टच्या पंक्तीत बसवले.

 






फोटो सौजन्य : दीपा करमाकर फेसबुक पेज