गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

चीन सुपर सीरिजमधून सायनाची माघार

WD
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल पुढील महिन्यात चीनमध्ये होणार्‍या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार नाही. ऑलिम्पकनंतर आणखी काही दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने सायनाने चीनमधील स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जपानमध्ये 18 ते 23 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या जपान ओपनमध्ये सायना खेळणार आहे.