शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 10 जून 2014 (12:04 IST)

जागतिक क्रमवारीत सानिया सहाव्या स्थानी

टेनिस कारकिर्दीतील पुढचा टप्पा गाठताना भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपली कामगिरी उंचावत सोमवारी दुहेरी प्रकारात जागतिक क्रमवारीत सहावे स्थान पटकाविले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या निकालानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रमवारीमध्ये सानियाने सहाव्या   स्थानावर मजल मारली आहे. रोलँड गॅरॉस येथे उप-उपान्त्य फेरीमधील सहकारी कारा ब्लॅक हिच्या साथीने केलेल्या कामगिरीच्या जोरावर सानियाने क्रमवारीमध्ये 430 गुण मिळविले. त्यामुळे सानियाचे जागतिक टेनिसमधील स्थान आठ क्रमांकानी उंचावले आहे. सानिया आणि कारा ब्लॅक यांच्या   जोडीला शुआई पेंग आणि सू-वेई हसै या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. ‘जानेवारीमध्ये मी या मोसमात खेळायला सुरुवात केली तेव्हा माझे उद्दिष्ट जागतिक क्रमवारीत कारकिर्दीत सर्वोत्तम स्थान पटकावाचे हे होते आणि हे साध्य झाल्यामुळे मी आनंदी आहे.’