मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , सोमवार, 6 जून 2016 (11:08 IST)

जोकोविकची ऐतिहासिक कामगिरी

फ्रेंच खुली स्पर्धा प्रथमच जिंकली; वर्षात 4 ग्रॅण्डस्लॅम  
येथील रोलँड गॅरॉसवर रविवारी खेळल्या गेलेल्या फ्रेंच खुल्या   टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले.
 
जोकोविकने हा इतिहास निर्माण केला. त्याने फ्रेंच खुली स्पर्धा प्रथमच जिंकून वर्षात 4 ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करून त्याच्या टेनिस कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्डस्लॅम पूर्ण केले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविकने ब्रिटनच्या अँण्डी मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा चार सेटस्च्या संघर्षानंतर पराभव केला. हा अंतिम सामना जवळजवळ सव्वा तीन तास खेळला गेला. जोकोविकला त्याला आता कोण रोखू शकत नाही, हे दिसून आले. मरेने पहिला सेट अगदी सहजपणे 6-3 ने घेतला. त्यानंतर  पिछाडीवरून पुढे येत जोकोविकने पुढचे तीन सेट जिंकले. दुसरा व तिसरा सेट जोकोविकने सहजपणे घेतला.