शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2015 (12:12 IST)

जोकोविक अव्वलस्थानी कायम

मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविकने आपले अव्वलस्थान कायम राखले. अलीकडेच झालेल्या चीन ओपन व शंघाय मास्टर्सचे जेतेपद जोकोविकने मिळवले होते. 
 
शंघाय मास्टर्सच्या जेतेपदासह जोकोविकने वर्षातील नववे तर कारकिर्दीतील 57 वे जेतेपद पटकावले. भारताच्या युकी भांब्रीने टॉप-100 मध्ये स्थान मिळवताना 99 वे स्थान पटकावले. 
 
शंघाय मास्टर्स उपजेतेपद पटकवारा फ्रान्सचा विल्प्रेड सोंगाने पुन्हा एकदा टॉप-10मध्ये प्रवेश केला. सोंगाने पाच स्थानाची प्रगती करताना दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ब्रिटनचा अँडी मरे दुसर्‍या तर स्वित्झर्लडचा रॉजर फेडरर तिसर्‍या स्थानी कायम आहे. मायदेशी सहकारी वांवरिका चौथ्या स्थानी आहे. 
 
भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीला अलीकडच्या काळातील चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून तो आता 99व्या स्थानी आहे. 2010 नंतर युकीच्या रुपाने एका भारतीय खेळाडूने टॉप 100 मध्ये प्रवेश केला आहे.