शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

जोकोविच विजेता

WD
नंबर वन नोवाक जोकोविचने रॅफेल नदालचे क्ले कोर्टवरील साम्राज्य समाप्त केले. अंतिम सामन्यात स्पेनच्या नदालचा ६-२, ७-६ असा पराभव करून नोवाकने मान्टे कार्ले मास्टर्स स्पर्धा जिंकली. नोवाकच्या या विजयामुळे नदालची आठ अजिंक्यपदाची मालिका खंडीत झाली. नदालने १११ मिनिटात विजय मिळवला.

या स्पर्धेत नदाल फक्त दोन वेळा पराभूत झाला आहे. याआधी तो २००३ मध्ये पराभूत झाला होता. त्यावेळी गुलिर्मा कोरीयाने त्याला पराभूत केले होते. विजयानंतर नोवाक म्हणाला, मी खूप आनंदी आहे, हा विजय खासच होता. नोवाकने पहिला सेट ४७ मिनिटात जिंकला. ७ सेट पॉइंट वाचवल्यानंतर नदालने टडबल फॉल्ट केला. एका गेममध्ये त्याने ५ सेट पॉइंट वाचवले होते. नोवाक म्हणाला, येथे खेळायला मला आवडते. एकदा का होईना जेतेपदाची संधी दिल्याबद्दल राफाचे आभार मानले. पाहिजेत. क्ले कोर्ट हंगामात या पेक्षा चांगला प्रारंभ मिळू शकत नाही. दुस-या सेटमध्ये नदालने ४-२ अशी आघाडी घेतली होती. परंतु सर्बियन नोवाकने जोरदार लढत दिली आणि ४-४ अशी बरोबरी साधली. सर्विस गमावल्याने तो ५-६ असा पिछाडीवर गेला. ही चूक सुधारताना नोवाकने नदालची सव्र्हिस तोडली. टायब्रेकमध्ये नोवाकने बाजी मारली. या स्पर्धेत नोवाक २००९ आणि १२ मध्ये नदालद्वारा पराभूत झाला होता. नदाल म्हणाला, नोवाक जे काही करीत आहे ते आश्चर्यकारक आहे. माझी आवडती स्पर्धा जिंकल्याबद्दल नोवाकचे अभिनंदन. नदालचे अंतिम फेरीतील रेकॉर्ड ३८-६ असे आहे. तो तीन वेळा नोवाकद्वारा, दोन वेळा रॉजर फेडरर द्वारा आणि एकदा झेबालोसद्वारा पराभूत झाला होता.