गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ज्वालाने घेतला सहा महिन्यांचा ब्रेक

PR
भारताचीस्टार बॅहमिंटनपटू ज्वाला गुट्टाने सहा महिने बॅडमिंटनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तिची महिला जोडीदार अश्विनी पोन्पाला नव्या जोडीदाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ज्वाला आणि अश्विनीची जोडी लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीतही पोहोचू शकली नव्हती आरि आता ज्वालाने सहा महिने विश्रांती घेण्याच ठरविले आहे.

अश्विनी म्हणाल ज्वालाने सहा महिने विश्रांती घेण्याचे ठरविले असून, मला नही जोडीदार शोधून तिच्या पुनरागमनपर्यंत खेळत राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी आता तरुण कोणासोबत मिश्र दुहेरीच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे. महिला दुहेरीसाठी अद्याप नवीन जोडीदारबाबत मी निर्णय घेतला नाही, परंतु महिनाभरात त्यावर निर्णय होईल.