शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

डेवीस चषक टेनिस : सर्बियाचा संघ अंतिम फेरीत

WD
सर्बिया आणि झेक रिपब्लिक या दोन संघाने डेवीस चषक टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि आता विजेतेपदासाठी या दोन संघात लढत होईल.

सर्बिया संघाने कॅनडाचा 3-2 ने पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. जानको टीपसारेविक याने सर्बियाला 4 वर्षात दुसर्‍यावेळी अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम परतीच्या सामन्यात व्हॅसेक पोसपिसील याचा 7-6 (7-3), 6-2, 7-6 (8-6) अशा संघर्षानंतर पराभव केला. तीन सेटमधील 2 सेट हे टायब्रेकरचे ठरले. तत्पूर्वी जगात अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविक याने मिलोस राओनिक याचा 7-6 (7-1), 6-2, 6-2 असा पराभव करून सर्बियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. सर्बियाचा संघ 2010 चा विजेता संघ आहे. तो आता हा अंतिम सामना 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सर्बियात आयोजित करेल. प्राग येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या उपान्त्य सामन्यात झेक रिपब्लिक संघाने अर्जेटिनाचा 3-2 असा पराभव केला. झेक संघाला अंतिम फेरी गाठणे अत्यंत कठीण असे झाले होते. परंतु, टॉमस बर्डीच आणि राडेक स्टेपानेक या जोडीने झेक संघाला पुरुष दुहेरीची लढत जिंकून अंतिम फेरी गाठून दिली.

2012 साली झेक आणि सर्बिया संघात अंतिम लढत खेळली गेली. ती झेकने 4-1 ने जिंकली होती. दोन वर्षापूर्वी सर्बियाने उपान्त्य फेरीत झेकचा 3-2 ने पराभव केला होता. सर्बियाकडे जोकोविक आणि टिपसारेविक आणि झेककडे बर्डीच आणि स्टेपानेक असे खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम लढत रंगतदार ठरण्याची शक्यता राहील.