गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

डेव्हिस चषकातही किवींना 'व्हाईटवॉश'

WD
भारताचे युवा टेनिसपटू सनम सिंग आणि युकी भांबरी यांनी रविवारी आशिया-ओशियाना गटाच्या वन रेलगिशनमधील रविवारी झालेल्या सामन्यांत आपपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून भारताला न्यूजीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषकात 5-0ने विजय मिळवून दिला. भारताने 2005 नंतर डेव्हिस चषकात प्रथमच कोण्या संघाला 'व्हाईटवॉश' दिला आहे. भारताने 2005मध्ये उझ्बेकिस्तानला 'व्हाईटवॉश' दिला होता.

भारताने शनिवारीच ही मालिका 3-0ने खिशात घातल्यानंतर युकी भांबरीने रविवारी जोस स्टॅथमविरुद्ध 2-6, 7-5, 7-6 (5) असे संघर्षपूर्ण विजय मिळवित किवींविरुद्ध 'व्हाईटवॉश' मिळविण्याच्या आशा वाढविल्या. अतिशय कडक उन्हात झालेला हा सामना दोन तान आणि 41 मिनिटापर्यंत रंगला. त्यानंतर आपल्या शेवटच्या सामन्याची प्रतीक्षा करीत असलेल्या सनम सिंगने अर्टेस सितकला एक तास आणि 17 मिनिटे चालेल्या लढतीत 6-4, 6-1 असे सहज पराभूत करून भारताला 'व्हाईटवॉश' मिळवून दिला.

भारताने दोन दिवसांतच तीन लढती जिंकल्यामुळे ते 2013च्या स्पर्धेसाठी ग्रुप वनमध्ये राहणार असल्याचे निश्चित झाले होते. एआयटीने या स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करणार्‍या युवा खेळाडूंना पूर्वीच त्यांचे बक्षीस देताना भारत आशिया-ओशियाना गटात खेळेपर्यंत संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.