गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

तिरंदाजी विश्वचषकात भारताला सुवर्ण

WD
भारताच्या महिला तिरंदाजांनी पोलंडमध्ये तिरंगा फडकवला. तिरंदाजी विश्वचषकात भारतीय संघाने महिलांच्या रिकव्र्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

दीपिका कुमारी, लैशराम बोम्बायला देवी आणि रिमी ब्रुईली या तिघींनी भारताला सलग दुस-या विश्वचषकात सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

फायनलमध्ये तिघींनीही शानदार कामगिरी बजावली आणि बलाढ्य दक्षिण कोरियावर २१९-२०५ अशा विजयाची नोंद केली.

याआधी जुलै महिन्यात कोलंबियात झालेल्या तिरंदाजी विश्वचषकातही भारताने सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंर पोलंडमध्ये विश्वचषकाच्या चौथ्या आणि अखेरच्या फेरीतही सुवर्ण मिळवत भारतीय महिलांनी तिरंदाजीत आपले वर्चस्व कायम राखले आहे.