शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 (09:24 IST)

तेलंगणा सरकारकडून सानियाला एक कोटीचा पुरस्कार

अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवणार्‍या सानिया मिर्झाला तेलंगणा सरकारकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. सानिया ही तेलंगणची ब्रँड अँम्बेसिडर आहे.

विजेतेपद मिळवल्यानंतर सानियाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. अमेरिकन ओपनपूर्वी सानियाला एक कोटी रुपये तेलंगण सरकारने दिले होते.