शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

दिग्गज धावपटू उसेन बोल्टचा दबदबा कायम

WD
जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने जगातील सर्वात वेगवान धावपटू असल्याचा मान कायम ठेवत लंडन ऑलिंपिकमध्ये १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक मिळविले. बोल्टने ऑलिंपिकमधील विक्रम नोंदवत ९.६३ सेकंदात १०० मीटर अंतर पार केले.

बीजिंग ऑलिंपिकमध्ये सर्वोत्तम वेळ नोंदविल्यानंतर बोल्टच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. बोल्टने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत शंभर मीटर शर्यतीत जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या बोल्टने रविवारी रात्री नोंदविलेली वेळ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम होती. बोल्टपाठोपाठ जमैकाच्या योहान ब्लेक याने रौप्यपदक मिळविले. त्याने ९.७५ सेकंदाची वेळ नोंदविली. तर अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिन याने ९.७९ सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक पटकाविले. २००७मध्ये दोनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या अमेरिकेच्या टायसन गे याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने ९.८० सेकंदाची वेळ नोंदविली. त्यापाठोपाठ अमेरिकेचाच रायन बेली हा ९.८८ सेकंदाची वेळ नोंदवत पाचव्या स्थानावर राहिला.