शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: ग्लासगो , सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (12:44 IST)

दोन अधिकार्‍यांच्या अटकेने भारताची बदनामी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  
 
भारतीय खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचे नाव उंचावत असताना दोन भारतीय अधिकार्‍यांच्या वर्तनामुळे देशाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ ओढवली आहे. ग्लासगो येथे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता आणि कुस्तीचे पंच वीरेंदर मलिक यांना अटक करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
 
राजीव मेहता यांना दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे तर वीरेंदर मलिक यांच्यावर विनभंगाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सोमवारी या दोन्ही अधिकार्‍यांना न्यायालयात हजर करणत येणार असून भारतीय व्यस्थापनाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात नकार दिला आहे. स्कॉटलंडार्ड पोलिसांनी अटकेबाबतच वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या घटनांबाबत काहीही माहिती देण्यात नकार दिला आहे.
 
2 ऑगस्ट रोजी 49 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला ग्लासगो येथील सिटी सेंटर येथे अटक करण्यात आली. त्याचचदिवशी 45 वर्षाच्या आणखी एका वृद्ध माणसाला पश्चिम ग्लासगोमध्ये अटक केल्याचे स्कॉटलंडार्डच्या प्रवक्तयाने स्पष्ट केले. अटक करण्यात आलेले दोघे भारताच्या 215 सदस्यांच्या पथकाबरोबर क्रीडा ग्रामामध्ये राहात नव्हते. दोघेही ग्लासगो येथील स्थानिक हॉटेलमध्ये राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्कॉटलंडार्डच्या संबंधित महिला प्रवक्त्याने म्हटले आहे की, मलिक यांना विनभंगाच्या आरोपाखाली अटक केली असल्याबाबत आताच काहीही माहिती सांगता येणार नाही. एडीनबर्ग येथील भारतीय दुतावासातील अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलीस आणि दुतावासाचे अधिकारी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 
दुजोरा न मिळालेल्या वृत्तानुसार मेहता यांनी दारू पिऊन गाडी चालविल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी अटकेबाबत कुटुंबालाही न कळविण्याची विनंती पोलिसांना केली आहे. मेहता यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबातील काही लोक ग्लासगो येथे सध्या उपस्थित आहेत. ग्लासगो येथील कायद्यानुसार मेहता यांनी नेमकी किती दारू घेतलेली होती यावर त्यांना मोठा दंड अथवा गाडी चालवण्यास बंदी किंवा कारावास होऊ शकतो.