शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नदालचा धक्कादायक पराभव

PR
'क्ले कोर्ट'चा बादशाह म्हणून ओळखळल जाणार्‍या स्पेनच्या राफेल नदालला वि‍म्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत धक्कादायक परावभ पत्करावा लागला. झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलने त्याला 6-7, 6-4, 6-4, 2-6, 6-4 असे पराभूत करीत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. नदालची 2005 नंतरची ही ग्रँडस्लम टेनिस स्पर्धेतील ही सर्वात खराब कामगिरी ठरली. सेंटर कोर्टवर झालेला हा साना बराच लांबला होता. उत्कृष्ट सर्व्हिस, बेसलाईन शॉट्स, तसेच ग्राऊंड स्ट्रोक्सद्वारे रोसोलने हा विजय मिळविला. नदाल यावेळी बचावात्मक खेळी करताना दिसत होता. सात वर्षांनंतर नदाल प्रथमच विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला आहे.