गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नदाल - नोव्हाक उर्वरित लढत आज होणार

WD
फ्रेंच ओपनच्या अजिंक्यपदासाठी सुरू असलेल्या राफेल नदाल आणि नोव्हाक जाकोव्हिच थरारक झुंजीत पावसाने खोडा घातला. त्यामुळे आज थांबलेली लढत सोमवारी खेळवली जाणार आहे. पावसामुळे दुसर्‍यांदा खेळ थांबला तेव्हा नदालने दोन तर नोव्हाकने एक सेट जिंकला होता. चौथ्या सेटमध्ये नोव्हाक २-१ असा आघाडीवर असताना पुन्हा पावसाचे आगमन झाले. पहिल्यांदा पाऊस आला तेव्हा नदालने पहिला सेट ६-४ जिंकला होता आणि दुसर्‍या सेटमध्ये ५-३ ने आघाडीवर होता. खेळ सुरू झाल्यानंतर नदालने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

पण, जिगरबाज नोव्हाकने थक्क करणारी मुसंडी मारली. पावसामुळे नदालची एकाग्रता भंग झाल्याचा पुरेपूर फायदा घेत तिसरा सेट ६-२ असा सहज खिशात घातला.

नदाल जिंकल्यास त्याचे हे फ्रेंच ओपनचे सातवे अजिंक्यपद ठरेल. तर नोव्हाक सलग चौथ्या ग्रॅण्डस्लॅमसाठी उत्सुक आहे.
क्ले कोर्टवर तुफानी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या नदालने पहिल्या सेटमध्ये अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखले. नोव्हाकने केलेल्या तब्बल २७ चुका नदालच्या पथ्यावर पडल्या. त्या तुलनेत नदालने फक्त १७ चुका केल्या. दोघांनी विनर मात्र सारखेच म्हणजे २0-२0 ठोकले. दुसर्‍या सेटमध्येही नदालने आपली तुफानी घोडदौड कायम राखली. हा सेट जिंकला असता तर नदालचे अजिंक्यपद नक्की झाले असते.

तत्पूर्वी, पहिल्या दोन सेट नदालने आराम खिशात घातले. आपल्या वेगवान खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या नदालने पहिल्याच सेटमध्ये ३-0 अशी खणखणीत आघाडी घेतली. ४-0 अशी आघाडी घेण्याचीही त्याला संधी होती. पण फोरहँण्डचे काही शॉट त्याने चुकवले आणि त्याचा फायदा घेत नोव्हाकने एक पाँइंट जिंकला.