शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नन्ह्या जलपर्‍या...

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये वरचढ ठरत आहेत, त्या अमेरिकेची १७ वर्षीय मिसी फ्रँकलिन आणि १५ वर्षीय लिथुआनियाची रुआ मिलुताएते. फ्रँकलिन आणि मिलुताएते या ‘नन्ह्या जलपर्‍या’ सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनल्या आहेत.

या जलपर्‍यांनी अनुक्रमे १00 मीटर बॅकस्ट्रोक आणि १00 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावून सगळ्यांना अचंबित केले आहे. फायनलमध्ये फ्रॅकलिनने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रजतपदक पटकावणार्‍या रेबेका सोनीचा पराभव करून १.0५.५५ सेकंदाची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. या विजयाबरोबर तिने गेल्या ४0 वर्षांत कधी न बनलेला विक्रम प्रस्थापित केला. ऑस्ट्रेलियाच्या शेन गुल्ड हिच्यानंतर सर्वांत कमी वयात सुवर्णपदक पटकावणारी मिलुताएते ही दुसरी जलतरणपटू ठरली. गुल्डने १९७२च्या म्युनिख ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.