शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (11:13 IST)

नरसिंगने जाणूनबुजून उत्तेजकसेवन!

पैलवान नरसिंग यादवविरोधात कोणताही कट केला गेला नसून तो स्वतः उत्तेजक द्रव्य घेत असल्याचं क्रीडा लवादाने म्हटलं आहे. नरसिंगने एकदा नाही तर अनेकवेळा जाणूनबुजून प्रतिबंधित केलेली उत्तेजीत द्रव्य घेतल्याचं क्रीडा लवादाचं म्हटलं आहे.

उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंग यादवला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.

‘वाडा’ने बजावलेल्या नोटिशीची कल्पना भारतीय कुस्ती महासंघाला किंवा नरसिंग यादवला नव्हती. ही नोटीस बजावल्याची माहिती उशिरा समजल्यामुळेच नरसिंगचा बचाव करता आला नाही, किंवा त्याच्याऐवजी दुसऱ्या पैलवानाला पाठवता आलं नाही, असा दावा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी केला आहे.