शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नाव न बदलण्याचा शारापोव्हाचा निर्णय

WD
रशियाची टेनिसब्युटी मारिया शारापोव्हाने आपले नाव बदलण्याचा विचार सोडून दिला आहे.

शारापोव्हा यूएस ओपनसाठी आपले नाव ’ शुगरपोव्हा’ असे करण्याच्या विचारात होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे शारापोव्हाने हा विचार सोडून दिला आहे, अशी माहिती तिचा एजंट मॅक्स आयसेनबडने दिली आहे.

शारापोव्हा यूएस ओपननंतर लगेचच स्पर्धेसाठी जपान आणि चीनमध्ये जाणार आहे. नाव बदलल्याने अनेक अडचणी येऊ शकतात, असे मॅक्सने म्हटले आहे. तर यूएस ओपनमध्ये प्रवेशपत्रिका पाठवताना शारापोव्हाने आपल्या मूळ नावाचाच वापर केल्याचे

स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे.रशियाची नागरिक असेलेली शारापोव्हा अमेरिकेची रहिवासी आहे.

त्यामुळेच अमेरिकेत केवळ यूएस ओपनपुरते नाव बदलून घेणार असल्याची चर्चा होती. शारापोव्हाने शुगरपोव्हा या नावाने कँडी आणि च्युर्इंगगम बाजारात आणले आहे. या ब्रँडच्याच प्रसारासाठी ती आपले नाव शुगरपोव्हा असे करण्याच्या विचारात होती. अर्थात शारापोव्हाने नुसता नाव बदलण्याचा विचार केल्याच्या बातमीनेही ’ शुगरपोव्हा’ ला प्रसिद्धी मिळाली हे वेगळं सांगायला नको.