गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: बंगळुरू , शनिवार, 29 नोव्हेंबर 2014 (12:06 IST)

पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का

चीनच्या चौदा वर्षीय यान बिंग्ताओने जागतिक स्नूकर स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवला. त्याने 12 वेळा विजेतेपद मिवणार्‍या भारताच्या पंकज अडवाणीला उपान्त्यपूर्व फेरीत 6-4 असे पराभूत केले. 
 
पंकज अडवाणी स्पर्धेत चांगल्या फॉर्मात होता. मात्र, चीनच्या यानविरुद्ध खेळताना त्याला आपल्या खेळावर लक्षच केंद्रित करता आले नाही. 
 
पहिली फ्रेम त्याने 38-63 अशी गमवली, तर दुसर्‍या फ्रेममध्ये 47-75 असा पराभव पत्करला. यानंतरचे सलग तीन फ्रेम जिंकून पंकजने 3-2 अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र यानने पंकजला संधीच दिली नाही.