शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: अ‍ॅडिलेड , सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (17:39 IST)

पंकज अडवाणीला विश्व स्पर्धेचे जेतेपद

भारताचा सर्वाधिक यशस्वी बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना रविवारी १४ व्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
 
30 वर्षीय अडवाणीने उत्कृषट खेळाचे प्रदर्शन करीत हा अंतिम सामना 1168 अंकाच्या फरकाने जिंकला. बंगळुरूचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंकजने वेळेच्या प्रकारातील आपले जेतेपद कायम राखण्यात यश मिळविले, शिवाय एक आठवड्यापूर्वी गिलख्रिस्टकडून झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.  
 
पंकजने सुरुवातीला १२७ गुण घेत आघाडी संपादन केली. नंतर गिलख्रिस्टच्या कमकुवतपणाचा लाभ घेत आणखी ३६० आणि ३०१ गुणांची कमाई करीत पाच तासांच्या या सामन्यातील पहिल्या तासात पंकजने सामन्यावर पकड निर्माण केली होती. ७०० गुणांच्या आघाडीनंतरही पंकजने २८४, ११९, १०१ आणि १०६ अशी कमाई केल्याने मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११०० गुणांची आघाडी झाली होती.