शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

पेस-सानिया जोडी उपांत्यपूर्व फेरीत

WD
अनुभवी लिएंडर पेस आणि सानिया मिर्झाने उत्कृष्ट सामंजस्याचे प्रदर्शन घडविताना मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत सर्बियाचा नेनाद जिमॉन्जिक आणि अ‍ॅना इवानोविकच्या जोडीला 6-2, 6-4 असा पराभव करून लंडन ऑलिम्पिकच्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

आता सानिया आणि पेसच्या भारतीय जोडीला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मॅक्स मिर्नई आणि व्हिक्टोरिया अझारेंकाच्या अव्वल मानांकित जोडीविरुद्ध झुंजावे लागेल.