शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

प्रचंड उकाड्याने हैराण शारापोवाचा निसटता विजय

PR
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सध्या स्पर्धेक प्रतिस्पर्ध्यांच्या कामगिरीमुळे नाहीतर प्रचंड उकाड्याने हैराण झाल्याचे दिसत आहे. रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवाने ४१ डिग्री तापमानात तब्बल साडेतीन तास सामना खेळून तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. शारापोवाला या सामन्यावेळी अनेकवेळा बर्फाचा आधार घ्यावा लागला. ती मधल्या वेळेत डोक्यावर टॉवेलमध्ये बर्फ ठेवून बसत होती. शारापोवाने दुस-या फेरीत इटलीच्या कॅरीन क्नॅप हिचा ६-३, ४-६, १०-८ असा पराभव केला. हा विजय मिळविण्यासाठी तिला तीन तास २८ मिनिटे मैदानावर झुंजावे लागले. उन्हाने हैराण झालेल्या शारापोवाकडून या सामन्यात १२ वेळा दोनवेळा चुका झाल्या. तर क्नॅपने सहावेळा तिची सव्र्हिस ब्रेक केली.विजयानंतर शारापोवा म्हणाली, या सामन्यातून माझा पराभव होणार असे मला वाटले होते. पण, अखेर विजय मला विजय मिळाल्याने आता चांगले वाटत आहे. पुन्हा लय मिळविणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.