शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

फेडररला यूएस ओपनमध्ये पराभवाचा धक्का

WD
स्वित्झर्लँडच्या रॉजर फेडररला यूएस ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीच याने फेडररचा ७-६, ६-४, ६-३, ६-३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे फेडररचे सलग सहा वेळा यूएस ओपन जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या सुरूवातीपासूनच बर्डीचने जोरदार सर्व्हिसच्या जोरावर सामन्यात आघाडी घेतली. त्याने पहिले दोन सेट सहज जिंकत (७-६, ६-४)सामन्यात आघाडी कायम ठेवली. मात्र तिस-या सेटमध्ये फेडररने पुनरागमन करत ६-३ असा विजय मिळविला. अखेर आपला खेळ पुन्हा उंचावत बर्डिचने चौथा सेट ६-३ असा जिंकला आणि सामन्यातही विजय मिळवला.