शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 8 जून 2014 (23:22 IST)

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : नादाल 9व्यांदा विजयी

राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच कुठल्याही स्पर्धेत, कोणत्याही टप्प्यावर आमनेसामने आले की मुकाबला कट्टर होतो. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम लढतीच्या निमित्ताने टेनिस विश्वातले हे मातब्बर योद्धे 42 व्या सामन्यात एकमेकांशी भिडले. आत्तापर्यंत आठवेळा ग्रँडस्लॅमचा मानकरी असलेला स्पेनचा राफेल नादाल याने दुस-या सेटमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच चा 7-5 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने 6-3 असे पॉइंट करत नादालला शह दिला होता. परंतू, नादालने आपणच विजयी होणार असल्याचे आपल्या खेळीतून सांगितले हते. खेळाच्या सुरवातीलाच नादालने आक्रमक पवित्रा घेत खेळ सुरू केला. आक्रमकतेचा परिणाम म्हणून नादाल दुसरा सेट विजयी झाला. त्यानंतर नादालने नोवाक जोकोविचचा 6-2 व 6-4 असा परावभत करत 9व्यांदा ग्रँडस्लँम आपल्या नावावर केला.