शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

फ्रेंच फुटबॉलपटूंना सेक्स प्रकरण भोवणार

WD
एका अल्पवयीन वेश्येबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल फ्रान्सचे फुटबॉलपटू फ्रँक रीबेरी आणि करीम बेंझेमा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

बायरन म्युनिचचा मिडफिल्डर रीबेरी (३०) आणि रियल माद्रिदचा स्ट्रायकर ब्रेंझेमा (२५) यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. रीबेरीने म्हटले आहे की, २००९ मध्ये म्युनिच हॉटेलवर झहिया डेहरचा उपभोग घेतला पण ती १७ वर्षाची
WD
असल्याचे आपल्याला माहित नव्हते. २००८ मध्ये पॅरीस येथे आपण अल्जेरीयाच्या डेहर बरोबर लैंगिक संबंध ठेवले नव्हते. असे बेंझेमाने म्हटले आहे. डेहरने म्हटले की, सेक्ससाठी दोन्ही व्यक्तींनी आपल्याला पैसे दिले होते पण आपण अल्पवयीन असल्याचे त्यांना माहित नव्हते.


सध्या डेहर २१ वर्षाची आहे. खेळाडूंचे हे प्रकरण कोर्टात गेले असून त्यावर २६ जून रोजी सुनावणी होणार आहे. पैसे देऊन अल्पवयीन मुलीशी सेक्स करणे हा गुन्हा असून त्याबद्दल गुन्हेगाराला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय ६० हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो.