शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

बार्सिलोना ओपन टेनिस ; राफेल नदालला विजेतेपद

WD
स्पेनचा आघाडीचा टेनिसपटू राफेल नदाल याने बार्सिलोना ओपन टेनिसचे आठव्यावेळी विक्रमी विजेतेपद मिळविले.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात संथ सुरुवातीनंतर नदाल याने निकोलस अलमाग्रो याचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्य फेरीत जगात पाचव्या स्थानावर नदालने फ्रान्सच्या बेनोइट पैरे याला 7-6 (2), 6-2 असे नमविले होते. हा सामना पावसाङ्कुळे लांबला आणि 86 मिनिटे खेळला गेला. अंतिम फेरीत मात्र पावसाची भुरभुर येऊनही त्याने दोनवेळा सर्व्हिस ब्रेककरून हा विजय मिळविला.

नदालने मागील आठवडय़ात मोन्टे कालरे स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. या वर्षीचे त्याचे हे चौथे विजेतेपद तर क्ले कोर्टावरील तिसरे ठरले आहे. त्याने अलमा ग्रोचा दहाव्यावेळी पराभव केला आहे. या विजाबद्दल मला समाधान वाटत आहे. हा आठवडा माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. येथील विजेतेपद म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे, असे तो म्हणाला.