शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

ब्रिटनचा अँडी मरे विम्बल्डन विजेता

लंडन, दि. 10- ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने विम्बल्डनचे दुसरे विजेतेपद मिळविले. त्याने रविवारी खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच अंतिम सामन्यात कॅनडाच मिलोस रावोनिकचा सरळ तीन सेटस्मध्ये पराभव केला.
 
मरेचे तच टेनिस कारकिर्दीतील दुसरे विम्बल्डन ग्रँडस्लॅम, तर एकूण तिसरे ग्रँडस्लॅम ठरले आहे. तने राओनिकचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव केला. तिसरा सेट हा अत्यंत अटीतटीचा व चुरशीचा ठरला. तिसर्‍या सेटमध्ये 2-2, 3-2, 4-3, 4-4, 5-4, 5-5, 6-5, 6-6 अशी बरोबरी झाली. त्यानंतर टाब्रेकरचा आधार घेण्यात आला. टाब्रेकरमध्ये मरेने 5-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर राओनिकने 1 गुण घेतला, पुन्हा मरेने 1 गुण घेतला. राओनिकने दुसरा गुण घेतला. शेवटी मरेने 7-2 अश्या टाब्रेकरमध्ये सामना जिंकला.