गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2015 (10:16 IST)

भारताची अर्जेन्टिनावर मात

जोहोर बाहरू (मलेशिया)- येथे सुरू असलेल्या पाचव्या सुलतान जोहोर चषकामध्ये भारतच्या ज्युनियर हॉकी संघाने अर्जेन्टिनाला 3-2 पराभूत करत विजय मिळवला.
 
भारतातर्फे अरमान कुरेशी, गुर्जत सिंग, निलकांत शर्मा यांनी प्रत्येक एक गोल केला. पहिल्या लढतीत पाकिस्तानाला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात भारताला ग्रेट ब्रिटनविरूद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. अर्जेन्टिनाविरूद्धच्या लढतीत मात्र भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत विजय खेचून आणला.
 
सामन्याच्या तिसर्‍टा मिनिटाला अरमान कुरेशीने अर्जेन्टिनाचा गोलरक्षक बोसोला चकवत पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच 11 व्या मिनिटाला गुर्जतने दुसरा गोल करत आघाडी वाढवली. 34 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मात्र भारताचा गोल करता आला नाही.