शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

भारतीय वंशाची मोनिषा एफ-1 टीमची प्रमुख

PR
फॉर्म्युला वन कार रेसिंगमधील स्वित्झर्लंडच्या सॉबर संघाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या मोनिषा काल्टेनबोर्नची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीमचे 70 वर्षीय प्रमुख पीटर सोबर यांची जागा ती घेईल. एफ-वनच्या यंदाच्या सत्रात हा संघ सहाव्या स्थानी आहे.

मोनिषा आठ वर्षांची असताना तिचे कुटुंबीय व्हिएन्ना येथे स्थलांतरीत झाले होते. तेथून तिने पदवी घेतल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदविका अभ्यासप्रम पूर्ण केला. 2000 साली तिने सॉबरमध्ये कायदा विभागात मोनिषाने काम सुरू केले होते. 2010 साली ती टीमची मुख्य कार्यकारी ‍अधिकारी झाली.