गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , बुधवार, 1 ऑगस्ट 2012 (20:19 IST)

भूपती-बोपन्नाचे ऑलिम्पिक आव्हान संपृष्टात

FILE
ऑलिम्पिकमध्ये जोडी जमवण्याच्या मुद्यावर वादास जन्म देणारे महेश भूपती व रोहन बोपन्ना टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत दुसर्‍या फेरित पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर झाले आहे.

त्यांच्या सातव्या मानांकित जोडीस जुलियन बेनातू आणि रिचर्ड गास्केट या फ्रांसच्या जोडीने ७७ मिनिट चाललेल्या लढतीत ३-६, ४-६ असा पराभव केला. यासोबतच या दोघांचा ऑलिम्पिक प्रवासही समाप्त झाला.

याचबरोबर टेनिसमध्ये भारताच्या आशा आता लिएंडर पेस आणि विष्णु वर्धन व मिश्र दुहेरित पेस व सानिया यांच्यावर केंद्रीत झाल्या आहेत. पेस व वर्धन यांचा दुसर्‍या फेरित मायकल लोड्रा आणि विल्फ्रेड सोंगा या फ्रांसच्या जोडीविरूद्ध मुकाबला होईल.

भूपती व बोपन्ना यांनी पहिल्या फेरित कडव्या लढतीत तीन सेट मध्ये विजय संपादन केला होता. या लढतीतही त्यांना आपल्या सर्व्हिसवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. बेनातू आणि गास्केट यांनी पहिल्या सेट मध्ये चौथ्या गेम मध्ये भारतीय जोडीची सर्व्हिस तोडली.

भूपती व बोपन्नाने दुसर्‍या सेट मध्ये चांगली सुरूवात केली. या सेटच्या दुसर्‍या गेम मध्ये ब्रेक प्वाइंट घेऊन एकावेळी ३-० ची आघाडी घेतली होती मात्र याचा फायदा त्यांना उठवता आला नाही आणि यानंतर सलग तीन गेम गमावल्यानंतर स्कोअर ३-३ ने बरोबरीत झाला.

भारतीय जोडीने यानंतर नवव्या गेम मध्ये सर्व्हिस गमावली, फ्रांसच्या जोडीने यानंतर दहाव्या गेम मध्ये सर्व्हिस वाचवत पुढच्या फेरित प्रवेश केला.