शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

भूपती-बोपन्ना सेमीफायनलमध्ये

ND
भारताची स्टार जोडी महेश भूपती व रोहन बोपन्ना यांनी मियामी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी फ्रान्सचा मायकल लोड्रा व सर्बियाच्या नेनाद जिमोनजीकचा पराभव करीत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्‍चित केले.

सहाव्या मानांकित भारतीय जोडीने तिसर्‍या मानांकित प्रतिस्पर्धी खेळाडूंवर १ तास ८ मिनिटे चाललेल्या लढतीत २-६, ६-३, १0-८ ने अशी मात केली. नुकतेच दुबई ओपन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणार्‍या भूपती व बोपन्ना यांनी सहापैकी चार ब्रेक पॉईंट वाचविले. पोलंडचा लुकास कुबोट, सर्बियाच्या यांको टिप्सरेविच व बेलारुसचा मॅक्स मिर्नयी व कॅनडाच्या डॅनियल नेस्टर यांच्यात होणार्‍या सामन्यात विजयी ठरलेल्या खेळाडूंशी उपांत्य फेरीत भारतीय खेळाडूंना दोन हात करावे लागतील.