शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे सिंधूला जेतेपद

WD
भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली आहे. सिंधूने अंतिम फेरीत कॅनडाच्या ली मिशेलेचा २१-१५, २१-१२ असा सहज पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

सिंधूने यापूर्वी मलेशिया ओपन ग्रँड प्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली होती. तसेच तिने ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले होते. सिंधूने उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या कुईन जिनजिंग हिचे कडवे आव्हान २१-१३, १८-२१, २१-१९ असे परतवून लावले होते.सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर आहे. कॅनडाच्या सातव्या मानांकित ली मिशेले हिने हॉंगकॉंगच्या तिस-या मानांकित पुई यिन यिप हिचे आव्हान २१-१५, २१-१६ असे मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

मी मकाऊ ओपन विजेतेपदाबाग्बत निश्चिंत होती,असे भारताची उभरती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधुने म्हटले आहे. विश्वाची ११वी मानंकित खेळाडू सिंधुने हे विजेतेपद पटकावले.

उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर मला कळाले होते की आता माझे फायनलमध्ये पोहचणे निश्चित आहे,असे सिंधुने सामना समाप्त झाल्यानंतर सांगितले. जर मी एखादी मोठी चुक करणार नाही तर माझे विजेतेपद जिंकणे निश्चित आहे असा मी विचार केला होता. मी हे विजेतेपद जिंकल्यामुळे खुप आनंदी आहे.सिंधुने मकाऊ ओपनसाठी जबरदस्त तयारी केली होती असे भारतीय संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले. गोपीचंदनुसार आम्ही गती आणि आक्रमकतेवर खूप काम केले होते. आम्ही सिंधूला तयारीच्या दृष्टीकोणाने चीन ओपनमध्ये खेळू दिले नव्हते. यामुळे आम्हाला तिच्यासोबत तयारीसाठी जास्त मिळू शकला.वर्ष २०१३ सिंधुसाठी खूप चांगले राहिले. मलेशियामध्ये ग्रां प्री विजेतेपद जिंकल्यानंतर सिंधु ऑगस्टमध्ये पहिल्यांदा विश्व मानांकित क्रमाच्या मुख्य-१० मध्ये पोहचली. यानंतर तिला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि नंतर तिने विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्य जिंकले.