शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

मारिया की सारा?

WD
रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना पुढील आठवड्यात जाहीर होणार्‍या विश्‍व क्रमवारीमध्ये अव्वल स्थान निश्‍चित केले आहे. आता शारापोव्हाला शनिवारी खेळल्या जाणार्‍या अंतिम लढतीत इटलीच्या सारा इराणीचा पराभव करीत कारकिर्दीतील ग्रॅण्ड स्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत यूएस चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या सामंता स्टोसूरला पराभवाचा धक्का देत ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठणार्‍या इराणीचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आकडेवारीचा विचार करता शारापोव्हाचे पारडे जड भासत आहे.
शारापोव्हाने २00४मध्ये विम्बल्डन, २00६मध्ये यूएस आणि २00८मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. २00५ ते २00८ या कालावधीत शारापोव्हा १७ आठवडे जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर होती. खांद्याच्या दुखापतीमुळे शारापोव्हाची तीन वर्षांपूर्वी १२६व्या स्थानावर घसरण झाली होती. त्या वेळी तिची टेनिस कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण, लढवय्या शारापोव्हाने चमकदार पुनरागमन करताना पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.