बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , बुधवार, 1 ऑगस्ट 2012 (20:19 IST)

मुष्टीयोध्दा विजेंदर व भगवान मुकाबल्यासाठी सज्ज

FILE
भारताचा स्टार मुष्टीयोध्दा विजेंदर सिंह (७५ किग्रा) आणि जय भगवान (६० किग्रा) ऑलिम्पिक स्पर्धेत उद्या प्री क्वार्टर फायनल लढतीत प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध भिडेल.

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा विजेंदर हा टेरेल गौशा विरूद्ध बाउट मध्ये उतरेल तर जय भगवान हा कझाकिस्तानच्या गानी झाइलाउओव विरूद्ध मैदानात उतरेल.

विजेंद्र आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच गौशाचा सामना करेल तर जय भगवान गानी याच्याकडून मागिल वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल.

या दोघांमध्ये दोन बाउट झाले असून दोघांनीही एक-एक बाउट जिंकला आहे. विजेंदर ऑलिम्पिकमध्ये विक्रमी तिसर्‍यांदा भाग घेत असून लंडनमध्ये तो पदकाच्या रंगात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.