शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: रिओ दि जानेरो , मंगळवार, 17 जून 2014 (11:18 IST)

मेस्सीची जादू : अर्जेटिनाची विजयी सलामी

फुटबॉल खेळात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला लिओनेल मेस्सी याने वैयक्तिक कौशलवर गोल केल्यामुळे अर्जेटिना फुटबॉल संघाने वीसाव्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

ब्राझीलमध्ये खेळल जात असलेल्या या स्पर्धेत ‘फ’ गटात अर्जेटिनाने पदार्पण करणार्‍या बोस्निया हर्जिगोर्विना संघाचा 2-1 ने पराभव केला. परंतु अर्जेटिना संघाला अपेक्षित वर्चस्व राखता आले नाही. तिसर्‍याच मिनिटाला मेस्सीने सुरेख चाल रचली. या चालीमुळे अर्जेटिनाला आघाडी मिळाली. परंतु हा गोल मेस्सीच्या नावावर जाऊ शकला नाही. मेस्सीला रोखण्याच्या प्रयत्नात बोस्निाचा सीड कोलासिनॅच याला लागून चेंडू जाळीत गेला व त्याने आपल्याच संघावर गोल नोंदविला.

या स्पर्धेतील दुसरा स्वंगोल ठरला. या आघाडीनंतर अर्जेटिनाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला, परंतु बोस्नियाच्या भक्कम बचावामुळे अर्जेटिना जास्त गोल नोंदवण्यात अपयश आले. मध्यांतरात अर्जेटिनाकडे 1-0 अशी आघाडी होती.

उत्तरार्धात 65 व्या मिनिटाला नव्याने तयार करण्यात आलेल्या मराकॅना मैदानावर मेस्सीने वैयक्तिक कौशल्लि पणाला लावीत फील्ड गोल केला तेव्हा उपस्थित 78 हजार प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरली. मैदानाच्या मध्यात मेस्सीने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने सहकारी गोन्झालेझ हिगुएन याच्या   साथीने बोस्निाच गोल कक्षात खोलवर मुसंडी मारली. त्यांच्या बचावपटूंनी या दोघांना रोखण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते रोखू शकले नाहीत. गोलपोस्ट नजरेच्या टप्प्यात येताच मेस्सीने डाव्या पायाने किक मारून अर्जेटिनाचा दुसरा गोल केला.

मेस्सीचा हा विश्वचषकातील केवळ दुसरा गोल ठरला. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना बोस्नियाचा राखीव खेळाडू वेदास इबिसेविच याने गोल केला आणि पराभवाचे अंतर कमी केले.

हिगुसन पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे प्रशिक्षक सॅबेल्ला यांनी 5-3-2 असे नियोजन केले व मेस्सीच्या साथीला सिगओ एगुएरो याची निवड केली. बोस्निया हा नवोदित संघ आहे. परंतु त्यांच्यावर स्वंगोलमुळे दडपण आले. तरीही त्यांनी अर्जेटिनाला सहजपणे वर्चस्व मिळू दिले नाही. पूर्वार्धात अर्जेटिनाचा गोलरक्षक सर्गिओ रामेरो याला सतर्क राहावे लागले. इझेट हाजरोविच आणि सेनाड लुसिच याचे हेडर अडविताना रामेरोला आपले वर्चस्व पणाला लावावे लागले. बार्सिलोनाचा सुपरस्टार मेस्सीची जादू चालली.